Wonderful Tenerife - Part 5 - The historic city of La Laguna

This was my last day in Tenerife. Next day, I was to board a return flight at about 6 in the morning. Hence, I had decided not to tire myself out, to limit myself to local sightseeing in and around the hostel and to do a bit of shopping. Incidentally, one of the lads staying in the hostel too had similar plans. So we decided that we would venture out together and take a look around the city of La Laguna. Being the only historic city of Tenerife, the city has its own significance. It is the second largest city in Tenerife. Located at a higher altitude and on the north of the island meant that the climate in the city was cool. However, sudden overcast skies and torrential rain were the norm. Having lived in Germany for a while, I was used to it. But as luck would have it, the day dawned bright, clear and sunny.

The city center of La Laguna
From the city tourism information center we selected a guided walking tour to the tourist attractions across the city. The guide provided us with a lot of interesting information about the place.
Since time immemorial, the Canary Islands were inhabited by a group of people called the Guanche. The region at the base of Anaga hills was called Aguere. The place had a lake that was considered to be holy by the locals. In the 15th century after the Spanish inquisition, a city called La Laguna (the lake) was built around the lake. Eventually, it became the capital city of the Canary Islands. During the conquest of the north and south Americas, the Canary Islands were an important port of call for Spanish seafarers. As a result, the Spanish population grew in number and the locals mixed up completely into the Spanish populace. Even today there are traces of the aboriginal traditions, cuisine, and language in the Canarian culture. Hence, even though a resident of the Canary Island is geo-politically Spanish, he still underlines his own unique cultural identity.


The main church in La Laguna









Using the layout of city of La Laguna as a reference, many cities were built in central and south America such as Old Havana in Cuba, Lima in Peru, San Juan in Puerto Rico etc. contributing to the importance of this city. In 1999, the city center of La Laguna was declared a World Heritage Site. The city center is the site of some of its most important churches, the main museum, small shops and restaurants. After shopping around for a while, we had our lunch and returned to the hostel.

The time for the return trip was fast approaching. Although the island is small there are a number of things to see. As I did not have a means of personal conveyance, it was not possible for me to visit all the places that I would have liked to see. However, I decided that the next time I am on the islands, I would ensure that I have a driving license that is valid in Europe and the necessary driving experience. Promising myself this, I boarded the bus back to the airport.

La Laguna and Anaga hills
For more pictures click here

Wonderful Tenerife - Part 4 - A mesmerizing journey through Anaga hills

This day was reserved for wandering amongst the Anaga hills. The north-eastern hilly region of Tenerife is known as Anaga. Of the triangular island this region forms one of the narrow vertices that tapers into the sea. It has a unique terrain that harbors an indigenous flora. Its main feature is the Laurisilva or Laurel forest that is typically found in the warm and temperature stable subtropical zones. The plants are broad-leafed and evergreen. In India, such forests are found in the Western Ghats of Kerala and in the hills of the eastern Himalayas. Amongst the Laurel forests in Europe, the forest in Anaga has the highest plant diversity. To wander around in such a forest was an activity I was eagerly looking forward to.

The laurel forest in Anaga
After looking up the maps and bus timetables, I finalized my route. After attending to my growing hunger, I set off towards the forest. Cruz del Carmen is a village located at an altitude of 900 meters in the Anaga hills. A path from the village leads to the coastal village of Punta del Hildago. It was this path that I had decided to tread. While having a conversation with my co-passengers in the bus I realised that most of them were taking the same route. Assuming that the place would be crowded like Mesca, I felt a bit disappointed. However, I then remembered the incident at the gorge in Mesca valley and perked up by saying ‘it’s always safe to have company’. Finally, the trek started. The path through Laurisilva was uncanny. While there was a blazing sun outside, the forest was a cool and humid. It reminded me of the paths of the fort trails in Sahyadri (a mountain range in Maharashtra province of India) during the monsoon season.

Anaga hills and the Atlantic ocean
The green valleys of Anaga hills


After some distance the forest started thinning out. This was an easy walk. Although the place was teeming with tourists, it was devoid of commotion. From the wilderness the path led to a plateau on the top of the mountain. This was the most picturesque part of the route. The green blanket of the forest covering the hills could be seen sloping down gently towards the azure waters of the Atlantic. The quiet and serene Atlantic Ocean appeared to lovingly embrace the gentle slopes. On the other side, the peaks of the Anaga mountains were visible. The path now became a steep descent down the slope. Every nook and corner presented an enchanting spectacle of the peaks and the ocean at different angles. After walking for a while, the village of Punta del Hidalgo appeared at a distance. The tiny village located on the shore and its lighthouse appeared as custodians of the surrounding natural beauty. Taking in the view, I moved on. The green hills started to fall behind leading to a valley with dusty and rocky grey rocks. This part of the route was lined with comparatively rough edges. Finally, we reached the village. After a bit of photography around the beach, I boarded the bus for my return journey.

Punta del Hidalgo as seen from Anaga hills
For more pictures click here

Wonderful Tenerife - Part 3 - A journey to the summit of Teide

The next day I decided to pay a visit to the dormant volcano, Teide. Located at the center of Tenerife, this volcano is a treat for researchers in the field of geology and biodiversity. I boarded a bus from Los Christianos, a city on the southern coast of Tenerife and set off towards the volcano. This road from the southern coast presents an ever-changing exciting collage of scenic geological vistas. At times the street was lined with multi-colored rocks and shrubs, while at other times it was lined with dense pine forests immersed in fog. Suddenly the bus entered a mountain pass. On emerging out of the pass, the main peak of Teide could be seen rising directly in the front.

The road that goes towards Teide


During the final stages of eruption, the region around the main peak sunk due to tectonic movements, which resulted in the formation of a massive crater nearly 16 km x 9 km in area. Large trees do not grow in this area. However, plants that thrive in arid area are abundant here. Because of its unique environment many endemic plants are found here. Teide White Broom, Teide Daisy and Teide Violet are some of the endemic plants found here. In spring, there is a riot bloom of plant life. A number of tourist throng here to have a look at the blooms. Since the eruption took place in phases, it has created many enchanting landscapes. Some regions resemble the lunar surface; other regions give one the impression of being on Mars. Teide and its surrounding area is protected by the Government of Spain as a national park. Besides, it has also been declared as a world heritage site by UNESCO.

The landscape around Teide
The bus stop at the base of Teide

Winding itself along the curves through such an enchanting region the bus eventually reached the foot of the volcano. The foot of the volcano itself is at a height of 2350 meters. There is a cable car facility that takes you close to the summit. But even the cable car does not take you near the summit. The final 200 meters has to be climbed on foot. However, this ascent can only be done with a government licensed and recognized guide with prior booking and registration. Due to the extremely sensitive nature of the ecology at the very top of the summit, there are limitations on its access. In December, these heights were covered in snow. Hence, the route leading from the cable car station to the top was closed. However, we were permitted to wander around in the surrounding areas. From the top, in a single glance, it was possible to see the entire Tenerife island, the surrounding azure sea as well as other islands of the Canary Island group. As luck would have it, the sky and the air was clear. So, after carrying out a bit of photography, I started on my way down the mountain.

The view from the summit of Teide. The islands La Palma and La Gomera can be seen at a far distance

The next day I had to change my hostel. Hence, that evening I spent in El Medano, and packed my belongings.

The next two days were planned to be spent on the North of the island. Accordingly, I embarked on my journey to Santa Cruz de Tenerife. This is the largest and the capital city of Tenerife. Hence, shopping malls, theaters, expansive gardens, restaurants offering international cuisine and a glut of other modern amenities are found in abundance. The auditorium, located on the beach is famous for its unique architecture. Its design creates an impression of the Sydney Opera. After a leisurely evening stroll along the beach, I returned to the hostel.

For more pictures click here.

Wonderful Tenerife - Part 2 - An adventurous trek in Mesca gorge

This was my second day in Tenerife. I had pre-decided to spend the day trekking on foot in the Mesca valley. Mesca is a small village in the north-western part of the island with a population of less than a 100 people. This hilly region of the island is known as the Teno mountains. The Meska village is located at an altitude of about 600 meters in this mountain range. The region around the Teno mountains has a semi-arid type of climate and is different from the other parts of the island in terms of its weather and biodiversity. A trekking trail from Mesca leads you down to the shore. The terrain surrounding this trail is popular with the tourists. I started off from the hostel at dawn and 4 hours later, after changing buses 3 or 4 times I arrived at Mesca.

If I had a personal conveyance, I would have easily made the journey in 1.5 hours. But I was not ready to spend. Besides, the option of renting a vehicle was not available to me for two reasons - lack of a valid European driving license and lack of relevant driving skills and experience. So be it. Somehow I managed to reach Mesca. The village was teeming with tourists. After satiating my hunger and thirst, I started on my trek down the slope. No sooner had the descent started when a large board with the danger sign popped up along the path. The risks associated with the trek were clearly listed on the board. My heart skipped a beat and I wanted to reconsider my decision. However, looking at the sheer number of people going down the route, I threw all caution to wind and decided to take the plunge (or rather, walk).

The terrain around Mesca village

A small brook flowed alongside the trail. This is the Mesca spring. At times the brook ran along innocently and playfully along the trail while at other times it surged and thundered down the rocks like a waterfall.  The brook criss-crossed the path a number of times. Hence, many a times we, the trekkers, had to walk through puddles of water. The rocks, made smooth and slippery by the flowing water, tested our skill in maintaining our balance. As the path winded down the slopes, the surrounding peaks appeared to loom taller and taller. At one point, the path led down into a deep gorge. The brook with its rhythmic sound filling the air, the cool breeze, the fierce peaks and the peaceful surroundings made me feel so relaxed that I developed a strong desire to sit down and meditate for a while. It also made me realize why Saint (Samarth) Ramdas must have chosen ‘Shivthar Ghal’ for his meditation. However, at that moment, a group of trekkers appeared on the scene. Their blabber and clamor wiped away all thoughts of meditation; and I moved on.

The Mesca spring
A bit further down the dirt trail, the path disappeared into the brook and the brook disappeared below a huge boulder. Uh Oh! What do I do now? Did I wander away from the track? Do I go on? I stood for a while trying to make up my mind and at the same time taking in the beauty of surrounding. Meanwhile, the trekkers that I had left back caught up with me. They too were travelling along the route for the first time and were confused by the scenario. So we started discussing our options. It was impossible to go around or climb the steep slope without proper rock-climbing tools. One of the brave lads suggested that that we get into the water and look past the boulder. Since we had no other choice, a few of us ventured into knee-deep water to look beyond. A bit further down the track through the narrow crevice below the boulder, we could see the light coming in from the opposite direction and a group of trekkers walking ahead. In short, we realized that this was the right route after all. Had the current of water been a wee bit strong, it would have been impossible to move on along that route. The warning at the beginning of the track now started to make sense.

The trail descends into the gorge



The rest of the trail was easy. Eventually, we began to get a feel of the salty sea breeze. The trail got relatively flat and sand started to creep into our shoes while walking. The signs implied that we were getting close to the coast but the coast was nowhere in sight. A cursory glance backwards brought into view the enormous Teno mountain range. The tiny Mesca village nestled amongst the hills of the valley stood out in stark relief. For a moment it was difficult to believe that we had traversed such a long way down the valley. I carried out a bit of photography and moved on. Just around the bend a lay surprise in wait … an azure sea stretched out to meet us. There was much elation and my heart did a victory dance. The shore was rocky and the foaming waves dashed on the rocks. The sheer cliffs of the surrounding hills fell directly to the waterline and embraced the waves. In the light of the setting sun, the scenery was mesmerizing. Meanwhile the boat arrived. I had made a prior reservation for the return journey by boat from the Mesca coast to the city of Los Gigantes. On reaching the city, I first took care of my inanition and returned to the hostel. A full day’s adventure had fatigued me out and I did not realize when I fell into a deep slumber.

The Mesca trail
For more pictures, click here

Wonderful Tenerife - Part 1 - Introduction to Tenerife

Initially, I wrote this travelogue on Tenerife in Marathi. A friend generously offered to translate the write up in English. Hoping to reach a wider audience through English, I agreed to the offer. So, here is the English version of the travelogue.

My travels and wanderings during the past four-and-a-half-year residency in Europe contribute to and perhaps constitute a large part of my material experience. Hence, I decided to write a blog on my sojourns. However, there exists a substantial volume of literature on the internet on the usual tourist spots and the anecdotal incidents associated with them and hence I decided to write about the places less known, the paths less travelled and the tracks least trod.

The Canary Islands is not a name that most Indians are familiar with. I don’t recollect reading about the islands in the ‘travel and tourism’ section of the Sunday-special supplement of the newspaper. During my time in Germany, one of my first colleagues I got acquainted with was from Spain. However, he always introduced himself as “… from Spain; but to be precise, from Canary Islands”. I was intrigued by his emphasis on “Canary Islands” and curiosity made me query ‘the all-knowing Google’ for information on the islands. The images displayed in the query results along with the information on the islands made me fall in love with them. So it was decided - it was imperative that I visit the islands at the earliest - and started looking for more information.

Geo-politically, the Canary Islands are a part of Spain. However, they are located far away from the Spanish mainland (– very much like our Andaman and Nicobar archipelagos). The Canary Islands are located in the Atlantic Ocean, about a 100 kilometres west off the coast of Morocco. The island group consists of seven large islands (viz. Tenerife, Fuerteventura, Gran Canaria, La Palma, La Gomera, and El Hierro) and a number of smaller islands. Of these, Tenerife and Gran Canaria have a population in the range of 0.7-0.8 million. The island of Tenerife is famous for its nature tourism and adventure sports whereas Gran Canaria attracts crowds interested in shopping and partying. Naturally, my attention was drawn to Tenerife.

Location of Canary Islands
The islands enjoy a subtropical climate. The temperature does not vary much through the year and the winters are especially pleasant on the islands. By contrast, the weather in Western Europe in winter can be described as ‘bleak and depressing’ (to be generous) with 6-7 hours of daylight, single digit temperatures, dull overcast grey skies and incessant rain adding to the gloom and misery. Hence, during Christmas break, many a European feet turn to the Canary Islands. A huge chunk of this is made up of the British and German populace. The popularity of the islands as a tourist destination, coupled with the fact that it was the holiday season instilled a fear in me that flying to the islands might be beyond my budget. However, due to the competition amongst various low-cost airlines, I was able to procure tickets to fly on Christmas eve at a price much lower than expected. So, after making appropriate hostel reservations and planning the itinerary, I donned on my clothes for the prevailing European winter but packed for a subtropical climate and off I was on my journey.

Upon landing at the airport to the south of Tenerife, I was greeted by the warm air, clear skies, bright sunlight and the mesmerizing sapphire blue ocean stretching out in front of me. The island of Tenerife has a unique layout. At the center of this roughly triangular island sits a 3700-meter-high dormant volcano named Teide. As a result of its enormous peak, the climate of the archipelago gets split into two distinct types. While the north-western region enjoys a Mediterranean climate, the south-eastern region has a dry, desert-type climate. As a result of this bifurcation, one also sees diversity in the vegetation and plant type and diversity in the life and culture of the local population. The north-western region is green throughout the year. The daytime temperature in the winter hovers around 10-15 °C with an occasional shower. In the south however, the temperature reaches 25 °C with a very rare shower. Often at times, warm air currents blowing from the African continent bring dust clouds with them covering the skies with dust. As a result, the southern region is mostly barren. A few thorny shrubs and cacti are the only visible signs of plant life. A number of plants capable of surviving in arid regions have been introduced in the south through plantation programs. Occasionally, amongst these plants, one finds the Gulmohar tree (Delonix regia), a well-known plant in India. Although barren, the southern region does have its share of natural beauty. Scenic shorelines, the volcanic range visible in the north and the peak of Teide towering over the rest present an endearing vista that is visible only from the south.

The terrain of Southern Tenerife
I had planned to spend 6 days on Tenerife – 3 days in the south and 3 days in the north. Since I had arrived on Christmas Day, it was a public holiday. Most of the shops were closed and the frequency of the buses plying the city too was low. Hence, I decided to spend my first day wandering around the village where I had taken up accommodation – El Medano, a small village located on the southern coast of Tenerife. The coast of El Medano is known for surfing. Located close to the village is Montana Roja, a mountain with a blood-red hue. A volcanic eruption millions of years ago created his mountain. A small dirt path leads to the top of the mountain. After half an hour of uphill trek I reached the summit. The rocks in the area reminded me the rocky plateaus of the Konkan region. From the summit I could see El Medano and the breathtakingly beautiful coast. After a bit of photography, I started on my way down on the other side of the mountain. The beach on the other side was beautiful. The mountain appeared to have a different shape from this side. The inward-curving shore with a misshapen, irregular blood-red mountain arising from behind at a distance presented an alien but endearing landscape. After resting for a while on the beach, I returned to the hostel to retire for the day.

El Medano village and the neighboring village from Montana Roja
A beach near El Medano
For more pictures, please click here

अद्भुतरम्य टेनेरीफं - भाग ५ - ऐतिहासिक ला लगुना

आजचा दिवस टेनेरीफं मधला शेवटचा दिवस होता. पुढच्या दिवशी पहाटे ६ च्या सुमारास परतीचं विमान होतं. त्यामुळे आज काही फारसं दमछाक करणारं स्थलदर्शन न करता फक्त हॉस्टेलच्या आसपास भटकंती आणि थोडीफार खरेदी असा बेत केला. योगायोगाने हॉस्टेल मधला एक मुलगाही अशाच विचारात होता. मग दोघांनी मिळून ला लगुना (La Laguna) शहर पाहायचे ठरवले. टेनेरीफं मधील एकमेव ऐतिहासिक शहर असल्याने या शहराला विशेष महत्व आहे. ला लगुना हे टेनेरीफं मधले दुसरे मोठे शहर. थोडसं उंचीवर आणि बेटाच्या उत्तर भागात असल्यामुळे या शहरात वातावरण जरा थंडच होते. शिवाय मधूनच झाकोळून येणं, भुरभूर पाऊस पडणं वगैरे गोष्टी नित्याच्याच. जर्मनीतल्या काही वर्षांच्या मुक्कामात अशा वातावरणाची सवयच झाली होती. पण नशिबाने आम्ही बाहेर पडलो त्या दिवशी स्वच्छ सूर्यप्रकाश होता. 

ला लगुना चा मध्यवर्ती भाग 
शहरातल्या पर्यटन माहिती केंद्रातून निघणारी चालत स्थलदर्शन करवणारी सहल निवडली आणि मार्गदर्शक सांगत होता ती मनोरंजक माहिती ऐकू लागलो.
कॅनरी बेटांवर अनादी काळापासून गुआन्ची (Guanche) नामक लोकांची वस्ती होती. अनागा टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशाला अगुएरे (Aguere) असे नाव होते. या ठिकाणी स्थानिकांसाठी पवित्र असलेला असा एक तलाव होता. १५ व्या शतकात स्पॅनिश लोकांच्या अतिक्रमणानंतर या जागी एक शहर वसवले गेले आणि नाव दिले गेले ला लगुना (the lake). हे शहर कालांतराने कॅनरी बेटांच्या प्रदेशाचे राजधानीचे शहर बनले. स्पॅनिश दर्यावार्दींच्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील सागर सफरींच्या काळात कॅनरी बेटे ही एक महत्वाचा थांबा असे. त्यामुळे उत्तरोत्तर येथे स्पॅनिश वस्ती वाढत गेली. येथील मूळ निवासी स्पॅनिश लोकांमध्ये मिसळून गेले. आजही त्यांच्या काही रूढी-परंपरा, खाद्यप्रकार, भाषेतील काही वाक्प्रचार कॅनरीयन समाजात आढळतात. म्हणूनच कॅनरी बेटांवरील व्यक्ती राजकीय दृष्ट्या जरी स्पेन ची नागरिक असली तरी स्वतःची वेगळी सांस्कृतिक ओळख अधोरेखित करते. 







ला लगुना मधील प्रमुख चर्च 
ला लगुना या शहराचा आराखडा प्रमाण मानून दक्षिण आणि मध्य अमेरिकेतली अनेक शहरे वसवली गेली. जसे क्युबा मधील ओल्ड हवाना, परू मधील लिमा, प्युर्तो रिको मधील सान हुआन इत्यादी. त्यामुळे या शहराला अधिकच महत्त्व प्राप्त झाले. १९९९ मध्ये ला लगुनाचा मध्यवर्ती भाग जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला. या मध्यवर्ती भागात काही महत्त्वाचे चर्च, मुख्य वस्तुसंग्रहालय, छोटीमोठी दुकाने, आणि उपहारगृहे आहेत. तिथे थोडीफार खरेदी आणि पेटपूजा करून आम्ही हॉस्टेलवर परतलो. 
  
आता परतीच्या प्रवासाची वेळ जवळ आली होती. एवढेसे बेट असले तरी बघण्यासारख्या जागा अफाट आहेत. स्वतःचे वाहन नसल्यामुळे सगळ्या जागा बघता येणे शक्यही नव्हते. त्यामुळे पुढच्या वेळी येताना युरोपात चालणारा परवाना आणि गाडी चालवण्याचा आवश्यक अनुभव यांची तजवीज करूनच यायचं असं मनोमन ठरवलं आणि विमानतळाकडे जाणारी बस पकडली.




ला लगुना शहर आणि अनागा टेकड्या
अधिक फोटोंसाठी क्लिक करा 

अद्भुतरम्य टेनेरीफं - भाग ४ - रमणीय अनागा टेकड्या

पुढचा दिवस ठरला होता अनागा टेकड्यांमधल्या भटकंतीसाठी. टेनेरीफं बेटाच्या ईशान्येकडचा डोंगराळ भाग अनागा म्हणून ओळखला जातो. त्रिकोणी आकाराच्या बेटाचे हे एक निमुळते होत भूशिरासारखे समुद्रात घुसले आहे. इथला भूप्रदेशही वैशिष्ट्यपूर्ण असून अनेक प्रदेशनिष्ठ प्रजातींचे वसतीस्थान आहे. इथले प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे लॉरिसिल्वा अरण्य (Laurisilva or Laurel forest). उपोष्ण कटिबंधातील दमट आणि स्थिर तापमानाच्या प्रदेशात ही अरण्ये आढळतात. येथील वनस्पती रूंदपर्णी आणि सदाहरित असतात. आपल्याकडे अशा प्रकारची अरण्ये केरळ मधील पश्चिम घाटाच्या परिसरात आणि पूर्व हिमालयातील टेकड्यांमध्ये आढळतात. युरोपातील अशा प्रकारच्या अरण्यांपैकी अनागा मध्ये असलेले अरण्य हे सर्वाधिक वनस्पतीवैविध्य असलेले अरण्य आहे. अशा या अरण्यात पदभ्रमण करण्यासाठी मी फारच उत्सुक होतो.

लॉरिसिल्वा अरण्यातून जाणारी पायवाट 

तिथला नकाशा आणि बसचं वेळापत्रक पाहून मी माझा मार्ग निश्चित केला आणि पेटपुजेची व्यवस्था करून मार्गस्थ झालो. अनागा टेकड्यांमधील क्रुझ डेल कार्मेन (Cruz del Carmen) या साधारण ९०० मीटर उंचीवरील गावापासून समुद्रकिनाऱ्यावरील पुंता डेल हिडाल्गो (Punta del Hidalgo) या गावापर्यंत उतरत जाणारा मार्ग मी निवडला होता. बसमधल्या सहप्रवाशांशी बोलता बोलता कळलं की या बसमधले बहुतांश पर्यटक याच मार्गानेच जाणार होते. इथे पुन्हा मस्का दरीसारखी पर्यटकांची गर्दीही असेल की काय या विचाराने माझा जरा हिरमोड झाला. पण मस्का दरीतला वाट शोधण्याचा प्रसंग आठवला आणि म्हटलं, थोडेफार लोक सोबतीला असलेले कधीही बरे! शेवटी पदभ्रमण सुरु झाले. लॉरिसिल्वा अरण्यातून जाणारा मार्ग फारच विलक्षण होता. बाहेर कडक उन असूनही अरण्यात ओलसर गारवा होता. हा मार्ग सह्याद्रीतल्या पावसाळी गड-वाटांची आठवण करून देत होता.


अनागा टेकड्या आणि अटलांटिक महासागर

काही अंतरानंतर अरण्य विरळ होत गेले. ही वाट तशी चालायला सोपी होती. पर्यटकांची वर्दळ असली तरी कलकलाट मात्र नव्हता. विरळ अरण्यातून ती वाट टेकड्यांच्या माथ्यावरील पठारावर येऊन पोहोचली. हा भाग या वाटेवरचा सर्वांत नयनरम्य भाग होता. हिरवे अरण्य पांघरलेला डोंगर निळ्याशार समुद्रात अलगद उतरत होता. शांत आणि धीरगंभीर असा अटलांटिक महासागर त्या हिरव्या सौंदर्याला अलगद कवेत घेत होता. दुसऱ्या बाजूला अनागा टेकड्यांमधल्या शिखरांचे दर्शन होत होते. इथून पुढे वाट तीव्र उताराची होती. प्रत्येक वळणावर टेकड्यांचे आणि समुद्राचे वेगवेगळ्या कोनांतून रोमांचक दृष्य दिसत होते. थोड्या अंतरानंतर पुंता डेल हिडाल्गो दिसू लागले. समुद्रकिनाऱ्यावरचे ते टुमदार गाव आणि त्याच्या शेजारचा दीपस्तंभ जणू त्या अनवट निसर्गाची निगराणी करत होते. त्या दृश्याला नजरेत सामावून घेत मी पुढे निघालो. आता हिरवेगार डोंगर मागे पडले होते. मातकट राखाडी कडे खोल दरीत उतरत होते. कड्यांच्या बाजूने जाणारी ती खडकाळ वाट आधीच्या नाजूक वाटेपेक्षा तशी रुक्षच होती. अखेरीस त्या गावी पोहोचलो. तिथल्या किनाऱ्यावर थोडे छायाचित्रण करून मी परतीच्या वाटेने जाणारी बस पकडली. 

दूरवर दिसणारे पुंता डेल हिडाल्गो गाव 
हिरव्यागार अनागा टेकड्या
अधिक फोटोंसाठी क्लिक करा 
https://www.flickr.com/photos/vihang_8846photos/albums/72157647783438234

अद्भुतरम्य टेनेरीफं - भाग ३ - टेईडं शिखर आरोहण

पुढच्या दिवशी टेईडं या सुप्त ज्वालामुखीवर जायचं ठरवलं. टेनेरीफं बेटाच्या मधोमध स्थित असलेला हा ज्वालामुखी म्हणजे भूगर्भशास्त्राच्या आणि जैवविविधतेच्या अभ्यासकांसाठी पर्वणीच!
टेनेरीफंच्या दक्षिण किनाऱ्यावरील लोस क्रीस्तीयानोस (Los Christianos) या शहरातून बस पकडून मी टेईडं च्या दिशेने निघालो. दक्षिण किनाऱ्यावरून येणारा रस्ता म्हणजे सतत बदलणाऱ्या रोमांचक भूदृष्यांचा खजिनाच! कधी विविधरंगी खडक आणि खुरटी झुडुपे, तर कधी घनदाट पाईन वृक्षांचे अरण्य आणि त्यातून उतरलेले धुके! तेवढ्यात बसने एक दोन पहाडांच्या मधून खोदलेल्या खिंडीत प्रवेश केला. खिंडीतून बाहेर पडताच टेईडं चे मुख्य शिखर समोर दिसू लागले. 

टेईडं शिखराकडे जाणारा रस्ता 
उद्रेकाच्या अंतिम टप्प्यात मुख्य शिखराच्या आसपासचा प्रदेश भूस्खलनामुळे खाली दाबला गेला आणि त्यामुळे जवळपास १६ किमी X ९ किमी आकाराचे प्रचंड विवर निर्माण झाले. या विवरात मोठे वृक्ष उगवू शकत नाहीत. मात्र शुष्क प्रदेशात आढळतात तशा वनस्पती मात्र चिक्कार उगवतात. इथल्या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमुळे अनेक प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे हे वसतीस्थान आहे. Teide White Broom, Teide Daisy, Teide Violet या इथल्या काही प्रदेशनिष्ठ वनस्पती. वसंत ऋतूत या वनस्पतींना बहर येतो. ते दृश्य बघण्यासाठी असंख्य पर्यटक इथे गर्दी करतात. अनेक टप्प्यांमध्ये झालेल्या उद्रेकामुळे या प्रचंड विवरात अनेक विलोभनीय भूदृश्ये निर्माण झाली आहेत. काही भाग तर चंद्रावरच्या किंवा मंगळावरच्या भूभागाचा आभास निर्माण करतो. हा सारा परिसर स्पेनच्या सरकारने राष्ट्रीय उद्यान म्हणून संरक्षित केला आहे. शिवाय जागतिक वारसास्थळ म्हणून याची नोंद आहेच.

टेईडं शिखराच्या सभोवतीचे भूदृष्य

टेईडं शिखराचा पायथा

अशा अद्भुत परिसरातून वळणे घेत घेत बस अखेरीस ज्वालामुखीच्या पायथ्याशी पोहोचली. हा पायथा मुळातच २३५० मीटर उंचीवर आहे. इथून माथ्यावर जायला केबल कारची सोय आहे. मात्र केबल कारही ज्वालामुखीच्या सर्वोच्च जागी जात नाही. शेवटचे २०० मीटर चढतच जावे लागते. हे आरोहण मात्र सरकारनियुक्त मार्गदर्शकासोबत आगाऊ नोंदणी करूनच करता येते. अति-संवेदनशील पर्यावरणामुळे ज्वालामुखीच्या सर्वोच्च जागी जाण्यावर मर्यादा आहेत. डिसेंबर महिन्यात हा अति उंचीवरचा भाग बर्फाच्छादित असतो. त्यामुळे माथ्यावरील केबल कार स्थानकाच्या पुढे चढाई करण्याचा मार्ग बंदच होता. मात्र स्थानकाच्या आसपास फिरता येत होते. इथून एका दृष्टीक्षेपात संपूर्ण टेनेरीफं बेट, आजूबाजूचा निळाशार समुद्र, आणि कॅनरी द्वीपसमूहातली इतर बेटे इतका विस्तृत परिसर न्याहाळता येत होता. नशिबाने वातावरण स्वच्छ होते. इथे थोडे छायाचित्रण करून मी खाली उतरलो. 

टेईडं शिखरावरून दिसणारा विस्तृत प्रदेश- दूरवर ला पाल्मा आणि ला गोमेरा बेटे दिसत आहेत 
  
पुढच्या दिवशी हॉस्टेल बदलायचे होते. त्यामुळे संध्याकाळचा वेळ एल् मेदानो मध्ये घालावला आणि सामानाची बांधाबांध करून ठेवली.

पुढचे २ दिवस बेटाच्या उत्तर भागात भटकायचे ठरवले होते. त्यानुसार सांताक्रूझ दे टेनेरीफं (Santa Cruz de Tenerife) या शहराकडे प्रस्थान केले. हे बेटावरचे सर्वात मोठे आणि राजधानीचे शहर. त्यामुळे इथे शॉपिंग मॉल्स, नाट्यगृहे, विस्तीर्ण उद्याने, जगभरचे खाद्यपदार्थ मिळतील अशी उपहारगृहे वगैरे आधुनिक सुविधांची रेलचेल आहे. इथले समुद्रकिनाऱ्यावर असलेले नाट्यगृह त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे. (http://auditoriodetenerife.com/) त्याची रचना सिडनीमधल्या ऑपेरा हाउसचा आभास निर्माण करते. इथे संध्याकाळचा एक फेरफटका मारला आणि हॉस्टेल वर परतलो. 

अधिक फोटोंसाठी क्लिक करा 

अद्भुतरम्य टेनेरीफं - भाग २ - मस्का दरीतली थरारक पायवाट

आज टेनेरीफंमधला दुसरा दिवस. आजचा दिवस मस्का व्हॅली (Masca valley) मध्ये पदभ्रमण करण्यासाठी निश्चित केला होता. मस्का हे बेटाच्या वायव्य भागातील जेमतेम १०० लोकवस्तीचे एक छोटेसे गाव. बेटाचा हा वायव्य भाग टेनो टेकड्यांचा (Teno mountains) प्रदेश म्हणून ओळखला जातो. याच टेकड्यांमध्ये साधारण ६०० मीटर उंचीवर मस्का गाव आहे. टेनो टेकड्यांचा हा प्रदेश निम्न-शुष्क प्रकारचा असून हवामानाच्या आणि जैवविविधतेच्या दृष्टीने हा प्रदेश बेटाच्या इतर भागांपेक्षा निराळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. मस्का गावातून एक पायवाट खाली उतरत समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाते. या वाटेवरचा भूप्रदेश पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. मी अगदी रामप्रहरी हॉस्टेलवरून निघालो. ३-४ वेळा बस बदलून ४ तासांनी मस्का गावात पोहोचलो. 


मस्का गाव 
स्वतःचे वाहन असते तर हा प्रवास दीडेक तासात सहज करता आला असता. पण तेवढा खर्च करायची तयारी नव्हती. शिवाय युरोपात चालणारा परवाना आणि गाडी चालवण्याचा आवश्यक अनुभव या दोन महत्त्वाच्या गोष्टीही नसल्याने गाडी भाड्याने घेणे हा पर्यायच उपलब्ध नव्हता. असो. मजल दरमजल करत शेवटी मस्का गावात पोहोचलो. इथे पर्यटकांची गर्दी होतीच. तहानलाडू-भूकलाडू यांची तजवीज करून मी पायवाटेने खाली उतरायला सुरुवात केली. उतरण सुरु होताच समोर आला भलामोठा धोक्याची खूण असलेला फलक. या पायवाटेने जाण्यात असलेले संभाव्य धोके तिथे स्पष्टपणे नमूद केले होते. काही क्षण मनात धाकधूक झाली. पण इतके सारे लोक तिथून खाली उतरताना पाहून मी बिनधास्त पुढे जायचा निर्णय घेतला.

मस्का गावातून खाली उतरणारी पायवाट 
या पायवाटेच्या बाजूने पाण्याचा एक ओहोळ वाहत होता. हाच तो मस्का झरा. हा झरा कधी नुसताच अवखळपणे बाजूने वाहत राही, तर कधी पाषाणांतून धबधब्यासारखा कोसळत खाली येई. हा झरा पायवाटेला असंख्य वेळा छेद देत होता. त्यामुळे अनेकदा पाण्याच्या डबक्यांतून चालावे लागत होते. पाण्याच्या प्रवाहाने निसरडे झालेले खडक आपल्या तोल सांभाळण्याच्या कौशल्याची परीक्षा घेत होते. जसजशी पायावाट खाली उतरत होती तसतशी बाजूच्या कड्यांची उंची वाढत होती. एका टप्प्यावर पायवाट एका खोल घळाईत उतरली. झऱ्याची सोबत होतीच. दरीमध्ये घुमणारा झऱ्याचा खुळखुळ आवाज, काहीशी थंड हवा, बाजूचे रौद्र कडे, आणि विलक्षण शांतता पाहून वाटलं, इथेच जरा वेळ बसावं आणि ध्यानमग्न व्हावं. समर्थ रामदासांनी त्यांच्या साधनेसाठी शिवथर घळ का निवडली असावी याचा प्रत्यय तिथे आला. मात्र तेवढ्यात एक ट्रेकर्सचा समूह तिथे अवतरला. त्यांचा कलकलाट बघून ध्यानाबिनाचा विचार सोडून मी मार्गस्थ झालो. 


घळईत उतरणारी पायवाट  
मस्का झरा 
                         























थोडं पुढे जाताच पायवाट झऱ्यामध्ये, आणि झरा एका प्रचंड दरडीखाली लुप्त झालेला दिसला. अरे बापरे! आता पुढे जायचं कसं? वाट चुकली बिकली तर नाही ना? मी जरां वेळ परिसर न्याहाळत उभा राहिलो. तेवढ्यात मागून येणारा ट्रेकर्सचा समूह तिथे पोहोचला. तेही सारे पहिल्यांदाच तिथे आले होते. आता वाट कुठून असेल याची चर्चा आम्ही चर्चा करू लागलो. त्या दरडीच्या बाजूने कड्यावरून कोणत्याही साधनाशिवाय चढत जाणे अशक्य होते. तेवढ्यात एका साहसी वीराने दरडीखाली डोकावून बघुयात असा विचार मांडला. त्या परिस्थितीत दुसरा कोणता पर्यायही दिसत नव्हता. शेवटी आम्ही दोन-तीन जण गुडघाभर पाण्यातून चालत दरडीखाली गेलो. थोडं पुढे जाताच पलीकडच्या बाजूने येणारा प्रकाश दिसला आणि पुढे चालणारे काही ट्रेकर्सही दिसले. थोडक्यात हीच योग्य वाट होती. पाण्याचा प्रवाह थोडा जास्त असता तर या वाटेने जाणे शक्यच नव्हते. पायवाटेच्या सुरुवातीला लिहलेल्या इशाऱ्याचं गांभीर्य आता लक्षात आलं.

पुढची वाट तशी सोपी होती. अखेरीस समुद्रावरचा खारा वारा जाणवू लागला. पायवाट तुलनेने सपाट झाली आणि चालताना वाळूही बुटात जायला लागली. समुद्रकिनारा जवळ आल्याची लक्षणं होती. पण समुद्र काही दिसत नव्हता. सहज मागे वळून पाहिलं तर त्या अजस्त्र टेनो पर्वत रांगा दृष्टीस पडल्या. त्यांच्या कुशीत इवलेसे मस्का गाव उठून दिसत होते. आपण एवढे अंतर उतरत आलो आहोत यावर क्षणभर विश्वासच बसेना. इथे थोडेफार छायाचित्रण केले आणि पुढे निघालो. समोरच्या कड्याला वळसा घालून पुढे जातोच तर काय, निळाभोर समुद्र समोर स्वागताला हजर! एक प्रकारची विजयी भावना मनात दाटली. किनारा तसा खडकाळच होता. समुद्राच्या फेसाळत्या लाटा त्या खडकांवर आदळत होत्या. आजूबाजूच्या टेकड्यांचे कडे सरळ पाण्यात उतरत होते आणि लाटांना अंगा-खांद्यावर खेळवत होते. एव्हाना पश्चिमेकडे कललेल्या सूर्याच्या प्रकाशात ते दृश्य फारच विलोभनीय दिसत होते. तेवढ्यात बोट आली. मस्का किनाऱ्यापासून लोस जीगान्तेस (Los Gigantes) या शहरापर्यन्तचा प्रवास आधीच आरक्षित करून ठेवला होता. शहरात पोहोचल्यावर पेटपूजा केली आणि हॉस्टेलवर परतलो. दिवसभराच्या साहसाने प्रचंड थकवा आला होता. पडल्या पडल्या झोप कधी लागली ते कळलेच नाही. 


Los Gigantes कडे जाताना
अधिक फोटोंसाठी क्लिक करा 

अद्भुतरम्य टेनेरीफं - भाग १ - टेनेरीफं ची तोंडओळख


आजकाल मराठीतून होणारे ब्लॉगिंग एकदमच तेजीत आहे. एकीकडे मराठी साहित्याचा होणारा ऱ्हास वगैरे निराशाजनक चर्चा सुरु असताना तरुण पिढी या नव्या माध्यमातून व्यक्त होताना पाहणे हे नुसतेच दिलासादायक नाही तर प्रेरणादायीही आहे. असेच काही मित्रमंडळींचे आंतरजालावरील मुक्त प्रकटन पाहून मीही लिहिते व्हायचे ठरवले. पण सांगण्यासारखं वेगळं काहीतरी असायला हवं ना! युरोपातल्या गेल्या साडेचार वर्षांतल्या मुकामात केलेली भटकंती हाच माझ्या अनुभव विश्वातला सर्वात मोठा भाग. त्यामुळे लिहायचं तर याच विषयावर हे नक्की केलं. मात्र युरोपातली नेहमीची पर्यटन स्थळं, तिथले मजेशीर किस्से यांबद्दल मराठीत चिक्कार लिहले गेले आहे. म्हणून ठरवलं, आपण लिहायचं ते फारशा माहित नसलेल्या स्थळांविषयी.


कॅनरी आयलंड्स (Canary islands) हा तसा भारतीयांसाठी अपरिचित प्रदेश. निदान रविवारच्या पुरवणीत पर्यटन विषयक सदरात तरी याचा उल्लेख कुठे वाचला नव्हता. जर्मनीमध्ये रहायला आल्यानंतर पहिलीच ओळख झाली ती  एका स्पॅनिश सहकाऱ्याशी. तो स्वतःची ओळख करून देताना कायम म्हणायचा, I am from Spain, but exactly from Canary Islands. एवढं ठासून सांगण्यासारखं आहे काय या प्रदेशात? मग गुगल महाशयांना प्रश्न विचाराला. उत्तरादाखल समोर आलेल्या छायाचित्रांकडे बघून मी तर या प्रदेशाच्या प्रेमातच पडलो. लवकरच इथे भेट द्यायची असं ठरवून मी अधिक माहिती शोधू लागलो. 

कॅनरी बेटे ही भू-राजकीयदृष्ट्या स्पेन चा भाग असली तरी त्यांचे स्थान मात्र स्पेनच्या मुख्य भूमीपासून बरेच दूर आहे. म्हणजे आपली अंदमान निकोबार बेटे आहेत तसे. मोरोक्कोच्या किनाऱ्यापासून जवळपास १०० किमी पश्चिमेकडे, अटलांटिक महासागरात हा द्वीपसमूह आहे. टेनेरीफं (Tenerife), फ्वेर्तेवेन्तुरा (Fuerteventura), ग्रान कनारीया (Gran Canaria), ला पाल्मा (La Palma), ला गोमेरा (La Gomera), आणि एल् हिएरो (El Hierro) अशी सात मुख्य बेटे आणि इतर काही लहान बेटे असा हा समुदाय आहे. यांपैकी टेनेरीफं आणि ग्रान कनारीया या दोन बेटांवर ७-८ लाख लोकवस्ती आहे. टेनेरीफं हे बेट निसर्ग पर्यटन आणि साहसी क्रीडाप्रकार यांच्यासाठी प्रसिद्ध, तर ग्रान कनारीया वर shopping आणि partying करणाऱ्यांची गर्दी. माझं लक्ष अर्थातच टेनेरीफं कडे वळलं. हवामानाच्या दृष्टीने ही बेटे उपोष्ण कटिबंधात (subtropical climate) येतात. तसे इथे वर्षभर तापमान सारखेच असते. विशेषतः हिवाळ्याच्या महिन्यांत तर इथले वातावरण अत्यंत सुखद असते. त्याच हिवाळ्यातल्या महिन्यांत पश्चिम युरोपातल्या देशांत फारच निराशाजनक वातावरण असतं. जेमतेम सहा-सात तासांचा दिवस, कमालीची थंडी, ढगाळ वातावरण, सतत भुरभुरणारा पाऊस या सगळ्यांचा विलक्षण वैताग येतो. त्यामुळेच नाताळाच्या सुट्टीत तमाम युरोपियन लोकांची पावले वळतात कॅनरी बेटांकडे. त्यात ब्रिटीश आणि जर्मन लोकांचा भरणा जास्त. या स्थळाची लोकप्रियता आणि सुट्टीचे दिवस यांमुळे विमनाची तिकिटे आवाक्याबाहेर असतील अशीच भीती वाटत होती. मात्र Low-cost airlines अंतर्गत स्पर्धेमुळे चक्क नाताळाच्या पूर्वसंध्येची तिकिटे अपेक्षेपेक्षा फारच स्वस्तात मिळाली. हॉस्टेल बुकिंग आणि स्थलदर्शनाची रूपरेषा ठरवून, अंगावर हिवाळी कपडे आणि बॅगेत उन्हाळी कपडे असा जामानिमा करून मी निघालो.

कॅनरी बेटांचे स्थान - नकाशा आंतरजालावरून साभार 

टेनेरीफंच्या दक्षिण विमानतळावर उतरल्या उतरल्या ऊबदार हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश, आणि निळाशार समुद्र बघून मन हरखून गेले. या बेटाची भौगोलिक रचना अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण त्रिकोणी आकाराच्या या बेटावर मध्याभागी ३७०० मीटर उंचीचा एक सुप्त ज्वालामुखी आहे. त्याचं नाव टेईडं (Teide). या महाकाय पर्वतामुळे या बेटाचे हवामानदृष्ट्या दोन भाग पडतात. उत्तर-पश्चिम भागात भूमध्य सागरी प्रदेशासारखे हवामान, तर दक्षिण-पूर्वेकडे वाळवंटी प्रदेशासारखे शुष्क हवामान. या विभागणीमुळे तिथल्या वनस्पती, पीकपाणी, लोकजीवन या सगळ्याच बाबतींत वैविध्य आढळते. उत्तर-पश्चिमेकडचा प्रदेश वर्षभर हिरवागार असतो. हिवाळ्याच्या दिवसांत इथे १०-१५ अंश सेल्सियस तापमान असते आणि अधूनमधून पाऊसही भुरभुरत असतो. दक्षिणेकडे मात्र २५ अंश सेल्सियस तापमान असते. पाऊस कधीतरी अवचित. कधी वारे आफ्रिकेकडून वाहायला लागले की सारा आसमंत धुळीने भरून जातो. त्यामुळे दक्षिणेकडचा भूभाग ओसाड आहे. थोडीफार काटेरी झुडुपे आणि कॅक्टससदृश वनस्पती एवढेच काय ते वनस्पतीजीवन. शुष्क प्रदेशात टिकून राहणारी बरीच परदेशी झाडे इथे लावण्यात आली आहेत. आपला गुलमोहरही दिसतो अधूनमधून. कितीही ओसाड असला तरी या दक्षिण भागाचे वेगळेच सौंदर्य आहे. रम्य समुद्रकिनारे, उत्तरेकडे दिसणाऱ्या ज्वालामुखीय पर्वतरांगा, आणि त्यातून डोकावणारे टेईडं विवर असे मोहक भूदृष्य येथे दिसते.

टेनेरीफंचा दक्षिण भूप्रदेश

माझ्याकडे ६ दिवस होते. ३ दिवस दक्षिणेकडे तर ३ दिवस उत्तरेकडे अशी रूपरेषा मी ठरवली. मुक्कामाच्या पहिल्याच दिवशी नाताळची सुट्टी होतीबहुतांश दुकाने बंद होती आणि बसही नेहमीपेक्षा कमी प्रमाणात धावत होत्या. त्यामुळे हा दिवस मी रहात होतो त्या एल् मेदानो गावाच्या आजूबाजूलाच भटकायचं असं ठरवलं. एल् मेदानो हे टेनेरीफंच्या दक्षिण किनाऱ्यावरचं एक छोटसं गाव. इथला समुद्रकिनारा सर्फिंग साठी प्रसिद्ध आहे. गावाच्या जवळच मोन्टाना रोजा नामक एक रक्तवर्णी पहाड आहे. लक्षावधी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखी उद्रेकातून या पहाडाची निर्मिती झालेली आहे. एक छोटीशी पायवाट आपल्याला पहाडावर घेऊन जाते. अर्ध्या तासाच्या खड्या चढणीनंतर मी माथ्यावर पोहोचलो. इथला खडक आपल्या कोकणातल्या सड्यांवरच्या खडकाळ जमिनीची आठवण करून देत होता. माथ्यावरून एल् मेदानो आणि आसपासचे समुद्रकिनारे यांचा नयनरम्य देखावा दिसत होता. इथे थोडेफार छायाचित्रण करून मी दुसऱ्या बाजूच्या पायवाटेने खाली उतरलो. पलीकडच्या बाजूचा किनारा फारच सुंदर होता. मोन्टाना रोजा पहाडाचा आकार इथून जरा वेगळाच दिसत होता. अंतर्वक्र आकाराचा किनारा आणि त्याच्या मागे उगवलेला हा ओभडधोबड लालसर पहाड असे वेगळेच भूदृष्य इथून दिसत होते. या किनाऱ्यावर जरा विश्रांती घेऊन मी हॉस्टेलवर परतलो.


मोन्टाना रोजा वरून दिसणारे एल मेदानो गाव आणि समुद्र किनारा 

एल मेदानो गावाचा समुद्रकिनारा 
 अधिक फोटोंसाठी क्लिक करा