माझ्याविषयी थोडंसं About me

नमस्कार. मी मूळचा मुंबईकर. व्यवसाय काहीही असो, स्वतःला आजन्म विद्यार्थी किंवा अभ्यासक म्हणायला मला जास्त आवडते. भटकण्याची आवड पहिल्यापासूनच. एकदा आडवाटेने जाऊन नवी-जुनी ठिकाणे हुडकून काढायचे व्यसन लागले की घरी स्वस्थ बसणे मुश्कील होऊन जाते. मग घरी असताना लेखनातून मुशाफिरी करायला काय हरकत आहे? म्हणूनच हा लेख-प्रपंच. यात प्रामुख्याने प्रवासवर्णने असली तरी अनुभवांच्या शिदोरीत जमा झालेले काही इतर विषयही इथे मांडले आहेत. शेवटी आयुष्य म्हणजे पण एक प्रवासच नव्हे का?

Hello! I am originally from Mumbai, India. Whatever be the occupation, I like to call myself a lifelong student. Roaming around has been my passion since long. Once you are hooked on to taking off the beaten paths and exploring new places, it gets difficult to sit at home. Then why not travel virtually through writing while at home? Thus comes this endeavor of writing. This blog mostly contains travelogues. However, I have also written on some topics that I have experienced in the course of life. Eventually, life itself is a journey, isn't it?